Saturday, 30 July 2016

दीप अम्वास्या ०२/०८०२०१६

*2nd August 2016*...
*Nandai's....HAPPY WAALLAA BIRTHDAY* ....
Coped from - सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)

दीप  अमवास्या, तुमच्या आईचा वाढदिवस. अतिशय पवित्र तिथी आहे. अनेकांनी प्रश्न विचारले होते, "बापू आम्ही काय करु शकतो, ह्या दिवशी?”

तर ह्या दिवशी रात्री १० नंतर घरामध्ये पणती पासून समईपर्यंत कुठलाही एक दिवा प्रज्वलित करा, घरात आरास करा, रांगोळी काढा. जशी इच्छा असेल तसे सजवा. शांतपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत रहा. त्या ज्योतीकडे बघत आई, आई, आई (३ वेळा) म्हणा.
एरव्ही आपण फुलाने दिवा शांत करतो. पण हा दिवा शांत करायचा नाही. ही ज्योत म्हणजे तुमच्या आईचे आगमन असेल, ह्याची खात्री मी देतो त्या दिव्याकडे बघता बघता म्हणायचे, Happy Birthday To You..... कुठल्याही भाषेत म्हणा जेव्हा आई, आई.... म्हणाल, तेव्हा आई आलेलीच असेल नक्की.
 
 
!! हरि ॐ!!

Tuesday, 19 July 2016

प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी

ll हरी ॐ ll
प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी :
( अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगष्ट २००९):
(१) आन्हिक दररोज दोन वेळा करणे.
(२) आन्हिक, रामरक्षा, सद्गुरु गायत्री मंत्र (अनिरुद्ध गायत्री मंत्र), सद्गुरु चालीसा (अनिरुद्ध चालीसा), हनुमान चालीसा व दत्तबावनि तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यातून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.
(३) बरोबरच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे, सहकाऱ्यांची किंवा हाताखालील व्यक्तिंची चुक झाल्यास त्यांना जरुर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
(४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणाऱ्या प्रत्त्येकाने ' आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.
(५) बोलण्यापेक्षा , बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.
(६) ह्या विश्वामधे कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दूसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही' असे म्हणु शकत नाही व असे कुणीही मानु नये.
(७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
(८) चुक झाल्यास चुक सुधारण्याची तयारी पाहिजे.
(९) परपीड़ा कधीच करता कामा नये.
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मुलभुत सिद्धांता नुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकड़े नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरुनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत.

ll अनिरुद्ध. ll

Tuesday, 17 May 2016

अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास

*पशुपालन* हा सेंद्रिय शेतीचा अविभाज्य घटक असून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करणारा पारंपरिक व्यवसाय आहे. गरीब गरजू आणि कष्टकरी शेतक-यांच्या  जीवनात रामराज्य येण्यासाठी *अनिरुद्ध इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास*  मार्फ़त पशुपालनाचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.

_रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशन पासून सुरु होतो आणि ग्रामराज्य म्हणजे ग्रामविकास_.
ग्रामविकास व्हायचा  असेल तर खेड्यातील शेतकऱ्यांचा विकास होणे आवश्यक आहे. 
त्यासाठी अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास' अंतर्गत *श्रीगोविद्यापीठम, कोठीम्बे, कर्जत, येथे २७ ते ३० मे २०१६* दरम्यान 'पशुपालन' हा पदविका (डिप्लोमा) कोर्स आयोजित करण्यात आलेला आहे.  हा कोर्स करुन ह्या ग्रामविकसच्या कार्यात खेड्यातील शेतकरी वर्ग तसेच शहरातील नोकदार वर्ग सहभाग घेऊ शकतो.

कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला *प्रमाणपत्र* देण्यात येते. आतापर्यंत अनेक श्रद्धावानांनी ह्याचा लाभ घेऊन विविध ठिकाणी सेवा कार्य सुरु केले आहे. आपणही ह्या संधिचा लाभ घेऊन ग्रामविकासाच्या कार्यात हातभार लावू शकता.

हा कोर्स *४ दिवस* असून गोविद्यापीठम येथे राहून करायचा आहे  त्यासाठी *६५० रुपये* (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)

(१५० रूपयात सकाळचा चहा-नाश्ता, दोनवेळाचे जेवण व राहण्याची सोय अंतर्भूत आहे)

तरी इच्छुक श्राद्धावानांनी जवळच्या उपासना केंद्रावर संपर्क साधावा तसेच दर गुरुवारी हरिगुरु ग्राम येथे गेट नं. ३ जवळ चौकशी करावी. अधिक माहितीसाठी
*विलाससिंह मालवदे 8652182626/9270056910  अभिजिसिंह येरुणकर 9819032961 अथवा श्रीधरसिंह पाटील 8108120666 यांच्याशी संपर्क साधावा*

।। हरी ॐ ।।   ।।श्रीराम।।।  ।। अम्बज्ञ।।

सुंदरकांड पठाण १७ ते २१ मे २०१६.

हरि ॐ,

सुंदरकांड पठाण  १७ ते २१ मे  २०१६ हरिगुरुग्राम येथे सकाळी ८.३० ते संध्यकाळी  ९ वाजेपर्यंत होणार आहे.

एक आवर्तन (पाठ) साधारण सवा तास चालेल प्रत्येकाला एक किंवा जास्त आवर्तन मिळेल .            
प्रत्येकाने सुदरकांड पुस्तक  आणावे किंवा हरिगुरुग्राम येथे सुद्धा  मिळेल.

यावेळी  ५ दिवसात चरखा शिबीर सुद्धा असेल.
    
सर्वांनी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त बहुभाषिक याना सुंदरकांड पठणास येण्यासाठी कळविणे.

पठणासाठी  २४ गुरुजी असणार आहेत.

प्रत्येकवेळी प्रत्येक अवर्तनास वेगळी चाल असणार आहे.

बापूंनि घडविलेली हनुमान मूर्ती सुद्धा दर्शनाला असेल.
       
हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।

Friday, 29 January 2016

श्री गोविध्यापिठम सेवा प्रत्येक रविवारी 2016

ll हरी ॐ ll   ll श्री राम ll   ll अम्बज्ञ ll

प्रती,

प्रमुख सेवक / ए ए डी एम संपर्क सेवक 

श्री गोविध्यापिठम येथे प्रत्येक रविवारी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत  AIGV ची सेवा होणार आहे. या सेवेसाठी ए ए डी एम

​ च्या ​

 १०० डी एम व्हींजची आवश्यकता आहे. ज्या डी एम व्हींजना या सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा डी एम व्हीं

​ज नी ​

 रविवारी सकाळी ९.०० वाजेपर्यंत श्री गोविध्यापिठम येथे पोहोचायचे आहे. डी एम व्हींजनी भोजन व नाष्टा यासाठी रु. १००/- श्री गोविध्यापिठम येथेच जमा करावेत. 

अधिक माहितीसाठी श्रीधर पाटील ८१०८१२०६६६ व अभिजित 

​ऎ​

रूणकर ९८१९०३२९६१ यांच्याशी संपर्क साधावा. 

रविवार दिनांक १४.०२.२०१६ रोजीच्या सेवेसाठी आपल्या उपासना केंद्रामधून १० डी एम व्हींज पाठवावेत. सदर सेवा श्रमाधारित असल्याने शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त डी एम व्हींजची नावे घ्यावीत. ए ए डी एम संपर्क सेवक यांनी आपल्या उपासना केंद्रावरील डीएमव्हीजची नांवे सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये aniruddhasadm@gmail.com व shridharsinhpatil@yahoo.co.in या ई मेल द्वारे बुधवार दिनांक १०.०२.२०१६ पर्यंत पाठवावीत. 

​प्रत्येक  सेवेप्रमाणे  ह्या  सेवेलासुद्धा  तुलसीपत्रे  मिळतील ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यवी. ​

अम्बज्ञ

आशुतोषसिंह टेंबे 

Saturday, 23 January 2016

म्हसा यात्रा सेवा-२०१६

हरि ॐ
म्हसा यात्रा सेवा-२०१६
म्हसा यात्रा सेवेसाठी आज दि-२३/१/२०१५ रोजी खालीलप्रमाणे केंद्रातील पुरुष व स्री DMV सेवेस हजर होते.
मुरबाड-पुरुष-१२ व स्री-०५
कात्रप(बदलापुर)-पुरुष-०५ व स्री-०४
तुळई-पुरुष-०३ व स्री-०१
सरळगाव-पुरुष-०३ व स्री-००
बदलापुर(EAST)-पुरुष-०६ व स्री-०५
बदलापुर(WEST)-पुरुष-०४ व स्री-०६
किन्हवली-पुरुष-०२ व स्री-००
वाचकोले-पुरुष-०४ व स्री-००
डोंबिवली(EAST)-OC मेंबर पुरुष-०१ विलाससिंह पावसकर
डोंबिवली(WEST)-PARAMEDICAL स्री-०१रश्मीविरा रहाटे
कल्याण(EAST)- DOCTOR पुरुष-०१ किरणसिंह तालिम
भिंवडी AC मेंबर-पुरुष-०१ निलकंठसिह पिलेवार

एकुण पुरुष-४२ व स्री-२२=६४

Monday, 18 January 2016

अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ ग्रामविकास

शहरातील बर्‍याच लोकांना हा प्रश्न पडतो की आम्ही सेंद्रिय शेती किंवा पशुपालन हे कोर्स करून काय करणार! श्रद्धावानहो टेरेस वर, बाल्कनी मध्ये, इमारतीच्या परिसरातील जागेत एवढेच का नुसत्या ग्रिल वर सुद्धा आपण घरात लागणार्‍या ताज्या भाज्या पिकवू शकतो. ह्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने कशा पिकवायच्या तसेच घरच्या घरी सेंद्रिय खते कशी तयार करायची त्यातील प्रमुख म्हणजे गांडूळ खत. घर चाळीत असो की गगनचुंबी इमारतीत असो आपण किमान लागणार्‍या भाज्या घरीच पिकवू शकतो हे सेंद्रिय शेती कोर्स केल्यानंतर शिकता येतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः मेहनत घेऊन रोज खत पाणी घालून पिकलेलं एक वांग सुद्धा एवढं समाधान देऊन जातं की ते बाजारात विकत मिळू शकत नाही.

              पशुपालन हा पारंपारिक भारतीय जोड धंदा असूनही हयाकडे व्यवसाय म्हणून बघितला न जाता एक पवित्र कर्तव्य म्हणून शेतकरी बघत असतो. गोमातेच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला माहीतच आहे. अशा मातेची सेवा या कोर्स अंतर्गत करण्याची ही संधी आहे. सेंद्रिय शेती मध्ये पशुपालनाला खूप महत्व आहे किंबहुना पशुपालन आणि सेंद्रिय शेती ह्यांचा अनोन्यसंबद्ध आहे.

हे कोर्स केल्यानंतर आपण इतर लोकांना मार्गदर्शन करू शकतो विविध सेवा करून अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ ग्रामविकास च्या मुख्य उद्देशाला म्हणजे शेतकर्‍यांच्या व ग्रामविकासाला हातभार लावू शकतो. हे कोर्स आपल्याला गोविद्यापीठम च्या पवित्र वातावरणात राहून शिकायची संधी मिळते. इथे शिक्षण घेताना पुरातन गुरुकुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

चला तर मग आपणही हा कोर्स करून बापूंच्या कार्यात हातभार लावू.
१). सेंद्रिय शेती कोर्स २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे एकूण ५ दिवस. ८०० रुपये (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)
२). पशुपालन कोर्स - ५ ते ८ फेब्रुवारी २०१६ असे एकूण 4 दिवस. ६५० रुपये (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)
(१५० रूपयात सकाळचा चहा-नाश्ता, दोनवेळाचे जेवण व राहण्याची सोय अंतर्भूत आहे)

तरी इच्छुक श्रद्धावानांनी जवळच्या उपासना केंद्रावर संपर्क साधावा तसेच दर गुरुवारी हरिगुरु ग्राम येथे गेट नं. ३ जवळ चौकशी करावी. अधिक माहितीसाठी विलाससिंह  माळवदे (8652182626) अथवा जयतसिंह वारेकर (7744843329) यांना संपर्क साधा

।। हरि ॐ।। ।। श्रीराम।। ।। अंबज्ञ ।।

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...