*पशुपालन* हा सेंद्रिय शेतीचा अविभाज्य घटक असून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करणारा पारंपरिक व्यवसाय आहे. गरीब गरजू आणि कष्टकरी शेतक-यांच्या जीवनात रामराज्य येण्यासाठी *अनिरुद्ध इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास* मार्फ़त पशुपालनाचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.
_रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशन पासून सुरु होतो आणि ग्रामराज्य म्हणजे ग्रामविकास_.
ग्रामविकास व्हायचा असेल तर खेड्यातील शेतकऱ्यांचा विकास होणे आवश्यक आहे.
त्यासाठी अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास' अंतर्गत *श्रीगोविद्यापीठम, कोठीम्बे, कर्जत, येथे २७ ते ३० मे २०१६* दरम्यान 'पशुपालन' हा पदविका (डिप्लोमा) कोर्स आयोजित करण्यात आलेला आहे. हा कोर्स करुन ह्या ग्रामविकसच्या कार्यात खेड्यातील शेतकरी वर्ग तसेच शहरातील नोकदार वर्ग सहभाग घेऊ शकतो.
कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला *प्रमाणपत्र* देण्यात येते. आतापर्यंत अनेक श्रद्धावानांनी ह्याचा लाभ घेऊन विविध ठिकाणी सेवा कार्य सुरु केले आहे. आपणही ह्या संधिचा लाभ घेऊन ग्रामविकासाच्या कार्यात हातभार लावू शकता.
हा कोर्स *४ दिवस* असून गोविद्यापीठम येथे राहून करायचा आहे त्यासाठी *६५० रुपये* (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)
(१५० रूपयात सकाळचा चहा-नाश्ता, दोनवेळाचे जेवण व राहण्याची सोय अंतर्भूत आहे)
तरी इच्छुक श्राद्धावानांनी जवळच्या उपासना केंद्रावर संपर्क साधावा तसेच दर गुरुवारी हरिगुरु ग्राम येथे गेट नं. ३ जवळ चौकशी करावी. अधिक माहितीसाठी
*विलाससिंह मालवदे 8652182626/9270056910 अभिजिसिंह येरुणकर 9819032961 अथवा श्रीधरसिंह पाटील 8108120666 यांच्याशी संपर्क साधावा*
।। हरी ॐ ।। ।।श्रीराम।।। ।। अम्बज्ञ।।
No comments:
Post a Comment