Wednesday, 23 December 2015

श्रीवर्धमान व्रताधीराज २०१५.

१.) व्रतकाल  व पठण 
 

मार्गशीर्ष  महिन्याच्या पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करावा. 

मार्गशीर्ष पौर्णीमा हा पहिला दिवस धरून एकंदर तीस दिवस ह्या व्रताचा काळ आहे. 

बरोबर तीसाव्या दिवशी व्रताचे उध्दापन  करावे. ( मग त्या दिवशी कुठलीही तीथी असो.)

श्रीमाद्पुरुषार्थ ग्रंथातील कुठलेही एक पाण / त्यातील स्तोत्र स्वेच्छेने निवडावे ह्यास व्रतापुष्प असे म्हणतात . 

मार्गशीर्ष पौर्णीमेस ह्या व्रतापुष्पाचे पठण सुरु करावे. 

मार्गशीर्ष पौर्णीमेस म्हणजेच पहिल्याच दिवशी एकदा पठण करावे. दूस-या दिवशी दोन वेळा, तिस-या दिवशी तीन वेळा, चौथ्या दिवशी चार वेळा असे दिवसागणिक एक-एक पठण वाढवत न्यावे. तीसाव्या दिवशी तीस वेळा  व्रतापुष्पाचे पठण करावे.

व्रतापुष्पाचे पठण कोणत्याही वेळेस करावे. परंतू  शक्यतो सलगपणे पठण करावे ( उदा : दहाव्या दिवशी किंवा  जो दिवस असेल त्या दिवसाच्या सनखेइतके पठाण एकाच वेळी सलगपणे करवे. 

काही अत्यावश्यक कारणामुळे व्रतापुष्पाचे पठण करीत असताना मध्येच उठावे लागले तर परत पठाणास बसताना,
" जय हरी हरेश्वर जय महामाहेश्वर. "

असे म्हणून पठण पुढे चालू करवे.

-पठण परमात्म्याच्या  मूर्ती वा प्रतिमेसमोर (बापूंचा फोटो ) करावे.

-जमिनीवर अथवा बैठकीच्या साधनावर ( ख्रुची इत्यादी ) बसताना चटई, सोवळे, कांबळे, रेशीम वस्त्र किंवा साधे सुताचे कापड ' आसन ' म्हणून वापरण्यास हरकत नाही. 

-परंतु निव्वळ जमिनीवर बसून पठण केल्यास अधिक चांगले. 

-प्रत्येकाने आपल्यास आवडणा-या परमात्म्याच्या स्वरूपाची प्रतिमा व्रतासाठी 'आराध्य ' म्हणून पठणाच्या वेळेस आपल्या समोर एका पाटावर किंवा तबकात ठेवावी. नंतर पठण झाल्यावर मूळ स्थानी ठेवण्यास हरकत नाही. अशी प्रतिमा घरातील देवघरात व भिंतीवर असल्यास तिच्याकडे पाहून पठण करण्यास सहज सोपे जात असेल तर ती खाली काढण्याची आवश्यकता नाही. 

-प्रतिमेस वा मूर्तीस सुंदर हार घातलेला असावा किंवा कमीत कमी प्राप्त फुले वहावीत. प्रतिमेसमोर निरंजन इत्यादी दीप प्रकार तसेच सुगंधी उदबत्ती असल्यास अधिकच सुंदर. 

-एका वेळेस अनेक मंडळी ज्यांचे व्रतपुष्प एकच आहे ( सारखे). एकत्र येवून पठण करू शकतात. स्वतःच्या किंवा इतरांच्या घरी. तसेच या सगळ्यांनी दररोज तीसही दिवस एकत्रच येवून पठण केले पाहिजे असे नाही. एखादा दिवस न आल्यास स्वतःच्या घरी पठण करवे. 

-पठण सुरु करताना व पठणाच्या शेवटी कमीत कमी प्रत्येकी एक वेळा अनिरुद्ध गायत्री मंत्र म्हणावा. 

-त्या त्या दिवसाचे पठण झाल्यानंतर साष्टांग दंडवत किंवा लोटांगण घालावे.

-व्रतकाळात स्त्रीयांचा मासीक धर्म, तसेच इतर कुठल्याही प्रकारचे असौच आड येत नाहीत. ( पठण सुरूच ठेवावे )

-व्रतकाळात बाहेर गावी जाणे झाल्यास परमात्म्याची छोटी प्रतिमा घेवून कुठेही व्रतपठण करण्यास हरकत नाही.

-व्रताधीराजाचे एकूण नऊ अंग आहेत. त्यापैकी व्रतकाळात ( तीस दिवस ) पठण ( व्रतपुष्प) आणि शेवटचे अंग म्हणजे उदयापनम  ही करावेच लागतील.

-सर्वच्या सर्व नऊ अंगे पाळल्यास अत्यंत श्रेयस्कर परंतू न जमल्यास व्रतकाळात व पठण तसेच उदयापनम ही दोन आवश्यक अंगे व उरलेल्या सात अंगापैकी कुठलीही तीन अंगे पाळणे आवश्यकच आहे.

२. वर्ज्य प्रकरण ( अंग दुसरे ) :

ह्या व्रताच्या काळात सकाळचा नाष्टा अल्पोप आहार तसेच दुपारच्या भोजनात मांसाहाराचे सेवन करू नये.

रात्रीच्या भोजनात मांसाहार करण्यास हरकत नाही.

ह्या संपूर्ण व्रतकाळात कडधन्याचे सेवन अजिबात करू नये. ( तूर, चणा, मटकी, हिरवे-काळे-पांढरे वाटणे, राजमा, चवळी, मसूर, वाल, पावटे ). उडीदाचा वापर जरूर करावा व मूग वापरण्यास हरकत नाही.

३. तिलस्नानम ( अंग तीसरे ) :

ह्या व्रतकाळात स्नानाअदी हलक्या हाताने शरीरास तीळाचे तेल लावावे. व नंतर शक्यतो कोमट वा गरम पाण्याने  स्वच्छ स्नान करावे. कमीत कमी दोन्ही हातास कोपरापासून खाली व दोन्ही पायास गुडघ्यापासून खाली तीळाचे तेल स्नानाआधी जरूर लावावे. 

डोक्यास तीळाचे तेल लावण्याची आवशक्यता नाही. 

तिलस्नानाने भौतिक, प्राणमय व मनोमय अशा तीनही देहांस शुभ स्पंदने स्वीकारणे सोपे होते. 

४. त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम  ( अंग चौथे ) :

व्रताच्या प्रथम दिवशी घराच्या दरवाजास कमीत कमी बारा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांचे तोरण बांधावे. 

ही चिन्हे तांबे, पंचधातू, चांदी किंवा सोन्यावरच आलेखिलेली असावीत. 

५. त्रिदोष धूपशिखा ( अंग पाचवे ) :

व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने स्नानानंतर ही धूपशिखा लावावी, तसेच पठणाची वेळ वेगळी असल्यास त्यावेळीही जरूर लावावी. 

ही त्रिविध दोषांचा नाश करते. ( कायिक,वाचिक व मानसिक )

ह्या धूपशिखेच्या प्रभावामुळे व्रत सफल, संपूर्ण होण्यास साहाय्य होते. 

६. त्रिपुरारी त्रिविक्रम भोग  ( अंग सहावे ) :

व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने परमात्म्यास दहीसाख्रेचा व संध्याकाळी दूधसाखरेचा नैवैद्य अर्पण करावा. 

मात्र त्या दिवशीचा नैवैद्य त्याच दिवशी प्रसाद म्हणून, व्रताधारकाने स्वतः ग्रहण करावा व इतरांस द्यावा. 

७. इच्छा दान  ( अंग सातवे ) :

व्रतकाळात व्रतधारकाने स्वेच्छेने भागवंतचरणी दक्षिणा अर्पण करावी, तसेच गरजूस सहाय्य करवे. 

ह्या व्रतकाळात केलेले दान दशगुणा फल देते. 

८. पुरुषार्थ दर्शन ( अंग आठवे ) :

व्रतकाळात प्रत्येक व्रतधारकाने कमीतकमी ९ वेळा परमात्मधामास पवित्र दर्शनासाठी जावे. 

ज्या व्यक्तीस शारिरीक करणामुळे घराबाहेर पडणे जमणार नाही अशा व्यक्तींना त्या ऐवजी शेवटच्या दिवशी ९ वेळा पठण आधिक करवे. 

९. उदयापनाम ( अंग नाववे ) :

व्रताच्या तीसाव्या म्हणजेच सांगतेच्या दिवशी पठाण पूर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस सुगंधित पुष्पांचे ९ हार अर्पण करावेत.

त्यानंतर एका तबकात नऊ दीप ठेऊन ते प्रज्वलित करावेत व आरती ओवाळून 'श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष' प्राथना म्हणावी.

''श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष'' प्राथना

ओमं नमो देवदेवेश परात्पर दत्तगुरो !
अष्टबीजस्मरणं सर्वथा रामदायकम !!
श्रीः शुद्धत्वं वैराग्यं व्यापकत्वं ओमं द्रां दत्तात्रेयाय नमः !
कालातीतव्यं वात्सल्यं ओम द्रां दत्तात्रेयाय नमः !
सर्वज्ञत्वं कारुण्यं ओम द्रां दत्तात्रेयाय नमः !
ओम नमो महामाहेश्वर प्रणवरूप परमात्मने !
नवांकुरस्मरणं सर्वथा शुभमंगलम !!
श्रीः भर्गः जन्मकर्मनिवारकम -ओम वासुदेवाय नमः !
श्रीः ओजः सर्व आरोग्यदायकम -ओम वासुदेवाय परम्पदाय नमः !
श्रीः शान्तिः सर्वत्रासुखकारिणी ओम परम्पदाय नमः !
श्रीः तृप्तिः सदैवयशदायानी ओम परम्पदाय संकर्षणाय नमः !
श्रीः श्रद्धा सर्वसामर्थ्यमूला ओम संकर्षणाय नमः !
श्रीः धैर्यः  सर्वसामर्थ्यवर्धिष्णू ओम संकर्षणाय प्रदयुम्नाय नमः !
श्रीः दया जीवशुद्धमतिः  ओम संकर्षणाय अनिरुद्धाय नमः !
श्रीः अनुकम्पा साक्षात वात्सल्यमूर्तिः ओम अनिरुद्धाय नमः !
श्रीः क्षमा भवतारिणी ओम अनिरुद्धाय अल्हादिनीपतये नमः !

-त्यानंतर नऊ लोटांगणे घालावीत .
-ह्यालाच श्रीवर्धमान व्रताधीराजाचे ''उद्यापनम'' असे म्हणतात.
-उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ''त्रीपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण'' सन्मानपूर्वक काढून पवित्र जागी ठेवावे.
-व्रतकाळ सोडून इतर वेळेस दरवाजास बारा संख्येपेक्षा कमी चिन्हांचे त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण लावण्यास हरकत नाही व असे इतर वेळचे तोरण कापडाचेही असण्यास हरकत नाही.
-श्रीवर्धमान व्रताधीराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ-अंकुर-ऐश्वर्यांची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग. ह्या व्रतास फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णीमेसच आरंभ करता येतो.
-मार्गशीर्षपोर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्रदिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात.
-काही अत्यावश्यक कारणांमुळे मधे खंड पडल्यास तितक्या दिवसांच्या दुप्पट दिवस व्रतात वाढवावेत.
-परंतु सहा दिवसांपेक्षा ( एकत्रित व अलग अलग ) आर्थिक दिवसांचा खंड पडल्यास व्रत दुपटीने दिवस वाढवूनसुद्धा  पूर्ण होत नाही. अशा वेळेस दुःख न मानता व्रत स्थगित करावे व पुढील वर्षी व्रत जरूर करावे.
-नाईलाजामुळे व्रत अपूर्ण राहिल्यास कुठ्लेही पाप अथवा दोष लागत नाही.
-''नरक''कुठे वर आकाशात किवा पाताळात नसतो तर तो जीवनातच प्रारब्धामुळे उत्पन्न होत असतो, श्रीवर्धमान व्रताधीराजाचे पालन करण्याने मनुष्याच्या जीवनात ''नरकयातना'' कधीच येत नाहीत.
-श्रीवर्धमान व्रतीधीराजच्या पालनात स्थूल, सूक्ष्म व तरल ह्या तीनही स्तरांवर भगवंतकृपेने आपोआपच प्रत्येक गोष्ट संपन्न होते.
--

Thursday, 27 August 2015

Aniruddha Bapu Marathi Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व

Aniruddha Bapu Marathi Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व
on YouTube - https://youtu.be/GA-9gqa7S-0

Published on 12 Aug 2015घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 July 2011

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व’ याबाबत सांगितले.
सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे. पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे. सद्गुरुतत्त्व आपल्या भक्तासाठी कुठलेही रुप धारण करते. ह्या सर्व सृष्टीचा विकास ह्याच्याच मुळे घडतो. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
बापु पुढे म्हणाले की नुकतीच गुरुपौर्णिमा झाली, आता श्रावण महिना सुरु होत आहे. श्रद्धावान या मासास
घोरकष्टोद्धरणचा महिना म्हणतात. ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्रपठणस्थळी जाऊन म्हणता येईल त्यांनी तिकडे जाऊन म्हणा, पण ज्यांना तिकडे जाणे शक्य नाही त्यांनी घरी तरी घोरकष्टोद्धरणचे पठण करावे. तिकडे गेलात तर अति उत्तम घरी केले तरी कुठे फुकट गेले. किती वेळ लागतो घोरकष्टोद्धरणचे १०८ वेळा पठण करायला? २.३० ते २.०० तास काही जण तर फास्ट म्हणतात त्यांना तर १.३० तासच लागतो. फास्ट म्हणालात यात चुकीचे काही नाही, म्हणालात हे महत्त्वाचे.
आलं लक्षामधे, इकडे सोपा मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्तोत्र, भगवान दत्तात्रेयांचे स्तोत्र लिहिणारे कोण साक्षात ‘श्रीवासुदेवानंद सरस्वती’ हे स्तोत्र आहे किती छोटे ५ श्लोकांचे. म्हणायला किती वेळ लागणार १.३० तास, २.०० तास, २.३० तास आणि संपुर्ण दिवसात थोडे थोडे म्हणा पण दिवसाला १०८ वेळा म्हणा, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन करा. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या गावो-गावी करा. तुमच्या गल्लीत करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजांनो करा, थोडा वेळ तुमच्या मुलांना म्हणता नसेल येत तर त्याला घेऊन बसा आणि ५ वेळा तरी म्हणायला लावा, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता. 
on YouTube - https://youtu.be/GA-9gqa7S-0

॥ हरिॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ 
। जय जगदंब, जय दूर्गे ।

Aniruddha Bapu

सर्व श्रध्दावानांस कळविण्यास मला आनंद होतो की गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी परमपूज्य श्रीअनिरुद्धबापू श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना व प्रवचनास उपस्थित राहणार आहेत.

या दिवशी फक्त एकच प्रवचन व तेही हिंदीतून होईल.

बापूंचे पहिले प्रवचन गोकुळाष्टमी १९९५ या दिवशी झाले व आज ह्या घटनेस वीस वर्षे झाली आहेत. परमपूज्य बापूंच्या सदगुरुंनी घालून दिलेल्या मर्यादेनुसार, यापुढे दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे म्हणजेच प्रवचनस्थळी परमपूज्य बापू फक्त एकदाच हिंदीतून बोलतील / प्रवचन करतील व दुसरे प्रवचन असणार नाही, याची सर्व श्रद्धावानांनी कृपया नोंद घ्यावी.
---------

I am pleased to inform all the Shraddhavans that ParamPoojya Aniruddha Bapu will be present on 3rd September at ShreeHariGuruGram for regular Upasana and Pravachan (discourse).

On that day, only one discourse will take place and that too in Hindi.

Bapu had delivered his first Pravachan (discourse) on the day of Gokulashtami in the year of 1995 and a period of twenty years has passed since that day. As per the principles (Maryada) laid down by Parampujya Bapu's Sadguru, henceforth on every Thursday at ShreeHariGuruGram (i.e. at discourse venue), there will be only one discourse of Parampujya Bapu, which will be in Hindi, and there will be no second Pravachan / discourse thereafter. All the Shraddhavans are requested to take the note of the same.
---------

सभी श्रद्धावानों को यह सूचित करने में मुझे खुशी होती है कि गुरुवार दिनांक ३ सितंबर को परमपूज्य श्रीअनिरुद्धबापू श्रीहरिगुरुग्राम में नित्य उपासना एवं प्रवचन के लिये उपस्थित रहनेवाले हैं।

इस दिन केवल एक ही प्रवचन और वह भी हिंदी में होगा।

बापू का पहला प्रवचन गोकुलाष्टमी १९९५ के दिन हुआ था और इस घटना को आज बीस साल हो चुके हैं। परमपूज्य बापू के सदगुरु द्वारा दी हुई मर्यादा के अनुसार, आज के पश्चात हर गुरुवार श्रीहरिगुरुग्राम में यानी प्रवचनस्थल पर परमपूज्य बापू केवल एक बार हिन्दी में बोलेंगे / प्रवचन करेंगे और उसके बाद दूसरा प्रवचन नहीं होगा| सभी श्रद्धावानों से विनति है कि कृपया वे इस बात पर गौर करें।

- Samirsinh Dattopadhye

नाशिक कुभमेला सेवा सुचना

अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टरमॅनेजमेन्ट

कुंभमेळा सेवा (नाशिक) २०१५

सेवेस जाणाऱ्या डि. एम. व्ही. साठीसूचना

 

१) प्रत्येक डि. एम. व्ही. कडे ए. ए. डी. एम्‌. चागणवेष असणे आवश्यक आहे. यात सफेद शर्ट,काळी पॅन्ट, बूट तसेच ए. ए. डी. एम्‌. ची कॅप, आर्मबेल्ट, पाउच ई. चा समावेश असणे आवश्यक आहे,त्याच बरोबर सेवा करतांना पॉकेट लाइन, शिट्टी,मास्क आणि सोबत Torch असणे आवश्यक आहे.

२) डि. एम. व्ही. ने ईतर आवश्यक असणारे कपडेबरोबर घ्यावेत.

३) डि. एम. व्ही. नी काही व्ययक्तिक औषधे चालूअसल्यास ती सोबत बाळगावी.

४) पावसाळा असल्या कारणाने सेवा करतांनारेनकोट असल्यास सेवा करण्यास सुलभ होईल.

५) प्रवासा दरम्यान व सेवेच्या दरम्यान पाण्याचीबाटली जवळ असावी.

६) प्रत्येक डि. एम. व्ही. ने आवश्यकतेनुसार सुकेखाणे (बिस्कीट, चिवडा) स्वत: जवळ बाळगावे.

७) सेवेदरम्यान मौल्यवान वस्तू बाळगु नये.

८) प्रत्येकाने स्वतःच्या सामानाची काळजी घेणेआवश्यक आहे.

९) प्रत्येक डि. एम. व्ही. ने आपल्या सद्गुरुंनी दिलेले"सुरक्षा कवच" स्वत: जवळ बाळगावे. जे डि. एम.व्ही. प्रथमच सेवा करत आहेत आणि त्यांच्या जवळवरील सद्गुरुंनी दिलेले "सुरक्षा कवच" नाही अशा डि.एम. व्ही. नी आपल्या को - ऑडीनेटरला तसेसांगावे तसेच  सेवेच्या आधी सद्गुरूंची उदी लावावी.

१०) सेवा सभानतेने करणे आवश्यक आहे.

११) सेवा काळामध्ये नेहमी सतर्क असावे.

१२) सेवेच्या ठिकाणी संशयास्पद वस्तु किंवा व्यक्तीपाहील्यास को - ऑडीनेटर किंवा जवळचअसलेल्या पोलीसांना कळवावे.

१३) प्रवास आणि सेवा दरम्यान वेळ आणि नियमयांचे पालन करावे.

१४) सेवेचा स्पॉट आणि राहते ठिकाण या दोन्हीस्थळांवरून को - ऑडीनेटरला सांगितल्या शिवायकुठेही जावू नये.

१५) सेवे दरम्यान कुठल्याही प्रकारच्या प्रसादाचेवाटप अथवा ग्रहण करू नये.

१६) सेवा करतांना डि. एम. व्ही. नी कुठेही पाण्यातउतरु नये.

१७) सेवे दरम्यान उपवास करू नये.

१८) पत्रकार किंवा न्यूज चनेल यांच्याशी आपणबोलू नये, त्यांना काही माहिती हवी असल्यास को -ऑडीनेटरशी संपर्क साधावा. 

१९) को - ऑडीनेटरने वॉकी टॉकी वर बोलतांनाथोडक्यात व कामाचेच बोलावे, इतर गोष्टी वॉकीटॉकी वर बोलू नयेत.

२०) सेवा सुरु असतांना शक्य असल्यासघोरकष्टोद्धरण स्तोत्राचे स्तवन करावे.

२१) प्रत्येकाने नाशिक कुंभमेळा सेवेचा व ए. ए. डी.एम्. चा Batch लावूनच सेवा करावी.

२२) डि. एम. व्ही. नी को - ऑडीनेटरच्या संपर्कातरहावे.

२३) प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईल फोनचा मर्यादितवापर करावा.

२४) ए. ए. डी. एम्. कंट्रोल रूम मधील डि. एम.व्ही. चे फोन नंबर जवळ असावेत.

२५) डि. एम. व्ही. नी "First Aid Kit" स्वतःच्यापाउच मध्ये बाळगावे.

२६) सेवा करतांना प्रत्येक डि. एम. व्ही. नी ही सेवाआनंदाने व भक्तीने करावयाची आहे, आपणसर्वजण परमपूज्य बापूंच्या खिडक्या आहोत हेलक्षात ठेवावे.

 

!! हरी ओम !! श्री राम !! अम्बज्ञ !!


-- 

ashutosh tembe CFP
9869089027/8691013831

www.orchidfp.com

Monday, 17 August 2015

!! श्रीरणचण्डिका प्रपत्ती !!

‘श्रीरणचण्डिका प्रपत्ती’ची पाच अंग व त्याचा विधी ‘रामराज्य - २०२५’ ह्या प्रवचनातून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे.

श्रीरणचण्डिका प्रपत्ती पाच तत्त्व:

श्रीरणचण्डिका महिषासूरमर्दिनी ही परमात्म्याची माता आहे. त्यामुळे हा परमात्मा सदैव तिला शरण असतो. आणि म्हणूनच मला ही तिला शरण जाणे आवश्यक आहे.ही चण्डिका श्रीमहिषासूरमर्दिनी आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आम्हा श्रद्धावानांचा सदैव प्रतिपाळ करतातच. हा दृढभाव राखणे व वारंवार त्याचे उच्चारण करत राहणे.श्रीचण्डिकेचा पुत्र ज्याला परमात्मा, महाविष्णू, परमशिव, साई, राम, कृ ष्ण म्हणतात, त्याचे आश्रयत्व पत्करणे. त्यांच्या आश्रयाला राहणे. त्यांचे नित्य स्मरण करणे, त्यांच्या आज्ञेत राहणे, तोच माझा आधार आहे ह्या निष्ठेने जगणे. (श्रद्धावानांसाठी सद्गुरु श्रीअनिरुद्ध हेच आश्रयस्थान).‘‘माय चण्डिके, तू मला स्वत: जवळ घे आणि मला परमात्म्याच्या हाती सोपव.’’ अशी चण्डिकेला प्रार्थना क रणे.श्रीचण्डिकेच्या कृ पेने अधिकाधिक भक्ती संपादन करून प्रपंच व अध्यात्म यशस्वी होण्यासाठी चण्डिकेला शरण जाणे. शरण जाण्याची क्रिया म्हणजे तिला व तिच्या पुत्राला, ‘तु बिन कौन सहारा, तूच एकमेव आधार’, अनन्यभाव, पूर्ण प्रामाणिकपणा ह्या निष्ठेने शरणागत असणे.
वरील पाच तत्त्वे मनात धारण करून श्रीरणचण्डिका प्रपत्ती केली जाते.

श्रीरणचण्डिका प्रपत्ती कशी केली जाते ?
श्रावणी सोमवारी पूजेचा मान असतो शिवशंकराचा व नृसिंहाचा. हे श्रावण सोमवारचे पूजन आहे. नृसिंहाचा नृसिंह अवतार म्हणजे अर्धा सिंह व अर्धा पुरुष.

श्रद्धावानाची नृसिंहाबाबत हीच श्रद्धा असली पाहिजे की , जो त्रिविक्रम आहे तोच नृसिंह आहे व नृसिंह आहे तोच त्रिविक्रम आहे. सूर्यास्तानंतर पुरुषांनी घरात वेगवेगळे बसून श्रीरणचण्डिका प्रपत्ती करायची आहे. त्याचा उपासनाविधी खालीलप्रमाणे आहे.

पुरुषांनी सूर्यास्तानंतरच स्नान करून श्रीत्रिविक्रमाच्या प्रतिमेसमोर बसून प्रथम श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र ९ वेळा म्हणावा.त्यानंतर ‘ॐ नमश्चण्डिकायै’ देवीसिंहाच्या गर्जनेतून उत्पन्न झालेला हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. कारण नरसिंहाचंच मूळ रूप असणारा त्रिविक्रम, तो परमात्मा देवीसिंह बनतो आणि त्याच्या गर्जनेतून हा मंत्र उत्पन्न झाला आहे. कशासाठी? तर पराक्रमासाठी. म्हणून पराक्रम देणारा हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे.त्यानंतर त्रिविक्रमाची प्रतिमा आपल्या डोक्यावर ठेवून परत नऊ वेळा श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र म्हणावा म्हणजे त्या त्रिविक्रमाचा नृसिंहपणा नरसिंहपणा म्हणजे पुरुषसिंहपणा मस्तकातून आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होतो. पुरुषामधला भित्रेपणा व दुबळेपणा नाहीसा करण्यासाठी याच्या सारखं औषध नाही. त्या नृसिंहाचं तेज पुरुषांच्या संपूर्ण शरीरामध्ये शिरतं आणि तो पुरुष घराचं, धर्माचं आणि देशाचं रक्षण करायला सिद्ध सैनिक बनतो.त्यानंतर, श्रीत्रिविक्रमाला दहिसाखरेचा नैवेद्य एका वाटीत व केळ्याचा नैवेद्य दुसर्‍या वाटीत अर्पण करावा. दोन्ही एकत्र करायचे नाहीत.दहिसाखरेतील एक पळी दहीसाखर प्रपत्ती करणार्‍या पुरुषाने त्रिविक्रमाला बघत आधी प्राशन करावे व केळ्यांचा प्रसाद घरातील सर्व स्त्री-पुरुषांस वाटावा.नंतर परत त्रिविक्रमासमोर बसून त्याच्याकडे बघत बघत उरलेले दहीसाखर प्रपत्ती क रणार्‍या पुरुषाने पिऊन टाकावे. दही हे ओज वाढविणारे आहे.नंतर त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करून लोटांगण घालावे.

सगळ्यात शेवटी फुले आहेत. फुले अर्पण करणे म्हणजे उपकार स्मरणे. थँक्स म्हणणे.
सोळा वर्षावरील कोणीही पुरुष ही ‘श्रीरणचण्डिका प्रपत्ती’ करू शकतो. मात्र हे चार पुरुषांनी एकत्र येऊन करायचं नाही. तर प्रत्येकाने एकेकट्याने करायचं आहे.

ही चण्डिकाप्रपत्ती पुरुषांना कमीत कमी आपल्या कुटुंबाचा रक्षक-बॉडीगार्ड बनवते; यशस्वी सैनिक बनवते. प्रत्येक कुटुंबाचे रक्षण झाले की, देशाचं रक्षण होणारच आहे व धर्माचं रक्षणही होणारच आहे. श्रीरणचण्डिका प्रपत्तीने पुरुषांचा पुरुषार्थ वाढेल, पराक्रम वाढेल व पुरुष बळ वाढेल.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...