Wednesday, 23 December 2015

श्रीवर्धमान व्रताधीराज २०१५.

१.) व्रतकाल  व पठण 
 

मार्गशीर्ष  महिन्याच्या पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करावा. 

मार्गशीर्ष पौर्णीमा हा पहिला दिवस धरून एकंदर तीस दिवस ह्या व्रताचा काळ आहे. 

बरोबर तीसाव्या दिवशी व्रताचे उध्दापन  करावे. ( मग त्या दिवशी कुठलीही तीथी असो.)

श्रीमाद्पुरुषार्थ ग्रंथातील कुठलेही एक पाण / त्यातील स्तोत्र स्वेच्छेने निवडावे ह्यास व्रतापुष्प असे म्हणतात . 

मार्गशीर्ष पौर्णीमेस ह्या व्रतापुष्पाचे पठण सुरु करावे. 

मार्गशीर्ष पौर्णीमेस म्हणजेच पहिल्याच दिवशी एकदा पठण करावे. दूस-या दिवशी दोन वेळा, तिस-या दिवशी तीन वेळा, चौथ्या दिवशी चार वेळा असे दिवसागणिक एक-एक पठण वाढवत न्यावे. तीसाव्या दिवशी तीस वेळा  व्रतापुष्पाचे पठण करावे.

व्रतापुष्पाचे पठण कोणत्याही वेळेस करावे. परंतू  शक्यतो सलगपणे पठण करावे ( उदा : दहाव्या दिवशी किंवा  जो दिवस असेल त्या दिवसाच्या सनखेइतके पठाण एकाच वेळी सलगपणे करवे. 

काही अत्यावश्यक कारणामुळे व्रतापुष्पाचे पठण करीत असताना मध्येच उठावे लागले तर परत पठाणास बसताना,
" जय हरी हरेश्वर जय महामाहेश्वर. "

असे म्हणून पठण पुढे चालू करवे.

-पठण परमात्म्याच्या  मूर्ती वा प्रतिमेसमोर (बापूंचा फोटो ) करावे.

-जमिनीवर अथवा बैठकीच्या साधनावर ( ख्रुची इत्यादी ) बसताना चटई, सोवळे, कांबळे, रेशीम वस्त्र किंवा साधे सुताचे कापड ' आसन ' म्हणून वापरण्यास हरकत नाही. 

-परंतु निव्वळ जमिनीवर बसून पठण केल्यास अधिक चांगले. 

-प्रत्येकाने आपल्यास आवडणा-या परमात्म्याच्या स्वरूपाची प्रतिमा व्रतासाठी 'आराध्य ' म्हणून पठणाच्या वेळेस आपल्या समोर एका पाटावर किंवा तबकात ठेवावी. नंतर पठण झाल्यावर मूळ स्थानी ठेवण्यास हरकत नाही. अशी प्रतिमा घरातील देवघरात व भिंतीवर असल्यास तिच्याकडे पाहून पठण करण्यास सहज सोपे जात असेल तर ती खाली काढण्याची आवश्यकता नाही. 

-प्रतिमेस वा मूर्तीस सुंदर हार घातलेला असावा किंवा कमीत कमी प्राप्त फुले वहावीत. प्रतिमेसमोर निरंजन इत्यादी दीप प्रकार तसेच सुगंधी उदबत्ती असल्यास अधिकच सुंदर. 

-एका वेळेस अनेक मंडळी ज्यांचे व्रतपुष्प एकच आहे ( सारखे). एकत्र येवून पठण करू शकतात. स्वतःच्या किंवा इतरांच्या घरी. तसेच या सगळ्यांनी दररोज तीसही दिवस एकत्रच येवून पठण केले पाहिजे असे नाही. एखादा दिवस न आल्यास स्वतःच्या घरी पठण करवे. 

-पठण सुरु करताना व पठणाच्या शेवटी कमीत कमी प्रत्येकी एक वेळा अनिरुद्ध गायत्री मंत्र म्हणावा. 

-त्या त्या दिवसाचे पठण झाल्यानंतर साष्टांग दंडवत किंवा लोटांगण घालावे.

-व्रतकाळात स्त्रीयांचा मासीक धर्म, तसेच इतर कुठल्याही प्रकारचे असौच आड येत नाहीत. ( पठण सुरूच ठेवावे )

-व्रतकाळात बाहेर गावी जाणे झाल्यास परमात्म्याची छोटी प्रतिमा घेवून कुठेही व्रतपठण करण्यास हरकत नाही.

-व्रताधीराजाचे एकूण नऊ अंग आहेत. त्यापैकी व्रतकाळात ( तीस दिवस ) पठण ( व्रतपुष्प) आणि शेवटचे अंग म्हणजे उदयापनम  ही करावेच लागतील.

-सर्वच्या सर्व नऊ अंगे पाळल्यास अत्यंत श्रेयस्कर परंतू न जमल्यास व्रतकाळात व पठण तसेच उदयापनम ही दोन आवश्यक अंगे व उरलेल्या सात अंगापैकी कुठलीही तीन अंगे पाळणे आवश्यकच आहे.

२. वर्ज्य प्रकरण ( अंग दुसरे ) :

ह्या व्रताच्या काळात सकाळचा नाष्टा अल्पोप आहार तसेच दुपारच्या भोजनात मांसाहाराचे सेवन करू नये.

रात्रीच्या भोजनात मांसाहार करण्यास हरकत नाही.

ह्या संपूर्ण व्रतकाळात कडधन्याचे सेवन अजिबात करू नये. ( तूर, चणा, मटकी, हिरवे-काळे-पांढरे वाटणे, राजमा, चवळी, मसूर, वाल, पावटे ). उडीदाचा वापर जरूर करावा व मूग वापरण्यास हरकत नाही.

३. तिलस्नानम ( अंग तीसरे ) :

ह्या व्रतकाळात स्नानाअदी हलक्या हाताने शरीरास तीळाचे तेल लावावे. व नंतर शक्यतो कोमट वा गरम पाण्याने  स्वच्छ स्नान करावे. कमीत कमी दोन्ही हातास कोपरापासून खाली व दोन्ही पायास गुडघ्यापासून खाली तीळाचे तेल स्नानाआधी जरूर लावावे. 

डोक्यास तीळाचे तेल लावण्याची आवशक्यता नाही. 

तिलस्नानाने भौतिक, प्राणमय व मनोमय अशा तीनही देहांस शुभ स्पंदने स्वीकारणे सोपे होते. 

४. त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम  ( अंग चौथे ) :

व्रताच्या प्रथम दिवशी घराच्या दरवाजास कमीत कमी बारा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांचे तोरण बांधावे. 

ही चिन्हे तांबे, पंचधातू, चांदी किंवा सोन्यावरच आलेखिलेली असावीत. 

५. त्रिदोष धूपशिखा ( अंग पाचवे ) :

व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने स्नानानंतर ही धूपशिखा लावावी, तसेच पठणाची वेळ वेगळी असल्यास त्यावेळीही जरूर लावावी. 

ही त्रिविध दोषांचा नाश करते. ( कायिक,वाचिक व मानसिक )

ह्या धूपशिखेच्या प्रभावामुळे व्रत सफल, संपूर्ण होण्यास साहाय्य होते. 

६. त्रिपुरारी त्रिविक्रम भोग  ( अंग सहावे ) :

व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने परमात्म्यास दहीसाख्रेचा व संध्याकाळी दूधसाखरेचा नैवैद्य अर्पण करावा. 

मात्र त्या दिवशीचा नैवैद्य त्याच दिवशी प्रसाद म्हणून, व्रताधारकाने स्वतः ग्रहण करावा व इतरांस द्यावा. 

७. इच्छा दान  ( अंग सातवे ) :

व्रतकाळात व्रतधारकाने स्वेच्छेने भागवंतचरणी दक्षिणा अर्पण करावी, तसेच गरजूस सहाय्य करवे. 

ह्या व्रतकाळात केलेले दान दशगुणा फल देते. 

८. पुरुषार्थ दर्शन ( अंग आठवे ) :

व्रतकाळात प्रत्येक व्रतधारकाने कमीतकमी ९ वेळा परमात्मधामास पवित्र दर्शनासाठी जावे. 

ज्या व्यक्तीस शारिरीक करणामुळे घराबाहेर पडणे जमणार नाही अशा व्यक्तींना त्या ऐवजी शेवटच्या दिवशी ९ वेळा पठण आधिक करवे. 

९. उदयापनाम ( अंग नाववे ) :

व्रताच्या तीसाव्या म्हणजेच सांगतेच्या दिवशी पठाण पूर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस सुगंधित पुष्पांचे ९ हार अर्पण करावेत.

त्यानंतर एका तबकात नऊ दीप ठेऊन ते प्रज्वलित करावेत व आरती ओवाळून 'श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष' प्राथना म्हणावी.

''श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष'' प्राथना

ओमं नमो देवदेवेश परात्पर दत्तगुरो !
अष्टबीजस्मरणं सर्वथा रामदायकम !!
श्रीः शुद्धत्वं वैराग्यं व्यापकत्वं ओमं द्रां दत्तात्रेयाय नमः !
कालातीतव्यं वात्सल्यं ओम द्रां दत्तात्रेयाय नमः !
सर्वज्ञत्वं कारुण्यं ओम द्रां दत्तात्रेयाय नमः !
ओम नमो महामाहेश्वर प्रणवरूप परमात्मने !
नवांकुरस्मरणं सर्वथा शुभमंगलम !!
श्रीः भर्गः जन्मकर्मनिवारकम -ओम वासुदेवाय नमः !
श्रीः ओजः सर्व आरोग्यदायकम -ओम वासुदेवाय परम्पदाय नमः !
श्रीः शान्तिः सर्वत्रासुखकारिणी ओम परम्पदाय नमः !
श्रीः तृप्तिः सदैवयशदायानी ओम परम्पदाय संकर्षणाय नमः !
श्रीः श्रद्धा सर्वसामर्थ्यमूला ओम संकर्षणाय नमः !
श्रीः धैर्यः  सर्वसामर्थ्यवर्धिष्णू ओम संकर्षणाय प्रदयुम्नाय नमः !
श्रीः दया जीवशुद्धमतिः  ओम संकर्षणाय अनिरुद्धाय नमः !
श्रीः अनुकम्पा साक्षात वात्सल्यमूर्तिः ओम अनिरुद्धाय नमः !
श्रीः क्षमा भवतारिणी ओम अनिरुद्धाय अल्हादिनीपतये नमः !

-त्यानंतर नऊ लोटांगणे घालावीत .
-ह्यालाच श्रीवर्धमान व्रताधीराजाचे ''उद्यापनम'' असे म्हणतात.
-उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ''त्रीपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण'' सन्मानपूर्वक काढून पवित्र जागी ठेवावे.
-व्रतकाळ सोडून इतर वेळेस दरवाजास बारा संख्येपेक्षा कमी चिन्हांचे त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण लावण्यास हरकत नाही व असे इतर वेळचे तोरण कापडाचेही असण्यास हरकत नाही.
-श्रीवर्धमान व्रताधीराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ-अंकुर-ऐश्वर्यांची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग. ह्या व्रतास फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णीमेसच आरंभ करता येतो.
-मार्गशीर्षपोर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्रदिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात.
-काही अत्यावश्यक कारणांमुळे मधे खंड पडल्यास तितक्या दिवसांच्या दुप्पट दिवस व्रतात वाढवावेत.
-परंतु सहा दिवसांपेक्षा ( एकत्रित व अलग अलग ) आर्थिक दिवसांचा खंड पडल्यास व्रत दुपटीने दिवस वाढवूनसुद्धा  पूर्ण होत नाही. अशा वेळेस दुःख न मानता व्रत स्थगित करावे व पुढील वर्षी व्रत जरूर करावे.
-नाईलाजामुळे व्रत अपूर्ण राहिल्यास कुठ्लेही पाप अथवा दोष लागत नाही.
-''नरक''कुठे वर आकाशात किवा पाताळात नसतो तर तो जीवनातच प्रारब्धामुळे उत्पन्न होत असतो, श्रीवर्धमान व्रताधीराजाचे पालन करण्याने मनुष्याच्या जीवनात ''नरकयातना'' कधीच येत नाहीत.
-श्रीवर्धमान व्रतीधीराजच्या पालनात स्थूल, सूक्ष्म व तरल ह्या तीनही स्तरांवर भगवंतकृपेने आपोआपच प्रत्येक गोष्ट संपन्न होते.
--

No comments:

Post a Comment

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...