Aniruddha Bapu Marathi Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व
on YouTube - https://youtu.be/GA-9gqa7S-0
Published on 12 Aug 2015घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 July 2011
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व’ याबाबत सांगितले.
सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे. पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे. सद्गुरुतत्त्व आपल्या भक्तासाठी कुठलेही रुप धारण करते. ह्या सर्व सृष्टीचा विकास ह्याच्याच मुळे घडतो. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
बापु पुढे म्हणाले की नुकतीच गुरुपौर्णिमा झाली, आता श्रावण महिना सुरु होत आहे. श्रद्धावान या मासास
घोरकष्टोद्धरणचा महिना म्हणतात. ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्रपठणस्थळी जाऊन म्हणता येईल त्यांनी तिकडे जाऊन म्हणा, पण ज्यांना तिकडे जाणे शक्य नाही त्यांनी घरी तरी घोरकष्टोद्धरणचे पठण करावे. तिकडे गेलात तर अति उत्तम घरी केले तरी कुठे फुकट गेले. किती वेळ लागतो घोरकष्टोद्धरणचे १०८ वेळा पठण करायला? २.३० ते २.०० तास काही जण तर फास्ट म्हणतात त्यांना तर १.३० तासच लागतो. फास्ट म्हणालात यात चुकीचे काही नाही, म्हणालात हे महत्त्वाचे.
आलं लक्षामधे, इकडे सोपा मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्तोत्र, भगवान दत्तात्रेयांचे स्तोत्र लिहिणारे कोण साक्षात ‘श्रीवासुदेवानंद सरस्वती’ हे स्तोत्र आहे किती छोटे ५ श्लोकांचे. म्हणायला किती वेळ लागणार १.३० तास, २.०० तास, २.३० तास आणि संपुर्ण दिवसात थोडे थोडे म्हणा पण दिवसाला १०८ वेळा म्हणा, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन करा. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या गावो-गावी करा. तुमच्या गल्लीत करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजांनो करा, थोडा वेळ तुमच्या मुलांना म्हणता नसेल येत तर त्याला घेऊन बसा आणि ५ वेळा तरी म्हणायला लावा, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
on YouTube - https://youtu.be/GA-9gqa7S-0
॥ हरिॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
। जय जगदंब, जय दूर्गे ।
No comments:
Post a Comment