अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टरमॅनेजमेन्ट
कुंभमेळा सेवा (नाशिक) २०१५
सेवेस जाणाऱ्या डि. एम. व्ही. साठीसूचना
१) प्रत्येक डि. एम. व्ही. कडे ए. ए. डी. एम्. चागणवेष असणे आवश्यक आहे. यात सफेद शर्ट,काळी पॅन्ट, बूट तसेच ए. ए. डी. एम्. ची कॅप, आर्मबेल्ट, पाउच ई. चा समावेश असणे आवश्यक आहे,त्याच बरोबर सेवा करतांना पॉकेट लाइन, शिट्टी,मास्क आणि सोबत Torch असणे आवश्यक आहे.
२) डि. एम. व्ही. ने ईतर आवश्यक असणारे कपडेबरोबर घ्यावेत.
३) डि. एम. व्ही. नी काही व्ययक्तिक औषधे चालूअसल्यास ती सोबत बाळगावी.
४) पावसाळा असल्या कारणाने सेवा करतांनारेनकोट असल्यास सेवा करण्यास सुलभ होईल.
५) प्रवासा दरम्यान व सेवेच्या दरम्यान पाण्याचीबाटली जवळ असावी.
६) प्रत्येक डि. एम. व्ही. ने आवश्यकतेनुसार सुकेखाणे (बिस्कीट, चिवडा) स्वत: जवळ बाळगावे.
७) सेवेदरम्यान मौल्यवान वस्तू बाळगु नये.
८) प्रत्येकाने स्वतःच्या सामानाची काळजी घेणेआवश्यक आहे.
९) प्रत्येक डि. एम. व्ही. ने आपल्या सद्गुरुंनी दिलेले"सुरक्षा कवच" स्वत: जवळ बाळगावे. जे डि. एम.व्ही. प्रथमच सेवा करत आहेत आणि त्यांच्या जवळवरील सद्गुरुंनी दिलेले "सुरक्षा कवच" नाही अशा डि.एम. व्ही. नी आपल्या को - ऑडीनेटरला तसेसांगावे तसेच सेवेच्या आधी सद्गुरूंची उदी लावावी.
१०) सेवा सभानतेने करणे आवश्यक आहे.
११) सेवा काळामध्ये नेहमी सतर्क असावे.
१२) सेवेच्या ठिकाणी संशयास्पद वस्तु किंवा व्यक्तीपाहील्यास को - ऑडीनेटर किंवा जवळचअसलेल्या पोलीसांना कळवावे.
१३) प्रवास आणि सेवा दरम्यान वेळ आणि नियमयांचे पालन करावे.
१४) सेवेचा स्पॉट आणि राहते ठिकाण या दोन्हीस्थळांवरून को - ऑडीनेटरला सांगितल्या शिवायकुठेही जावू नये.
१५) सेवे दरम्यान कुठल्याही प्रकारच्या प्रसादाचेवाटप अथवा ग्रहण करू नये.
१६) सेवा करतांना डि. एम. व्ही. नी कुठेही पाण्यातउतरु नये.
१७) सेवे दरम्यान उपवास करू नये.
१८) पत्रकार किंवा न्यूज चनेल यांच्याशी आपणबोलू नये, त्यांना काही माहिती हवी असल्यास को -ऑडीनेटरशी संपर्क साधावा.
१९) को - ऑडीनेटरने वॉकी टॉकी वर बोलतांनाथोडक्यात व कामाचेच बोलावे, इतर गोष्टी वॉकीटॉकी वर बोलू नयेत.
२०) सेवा सुरु असतांना शक्य असल्यासघोरकष्टोद्धरण स्तोत्राचे स्तवन करावे.
२१) प्रत्येकाने नाशिक कुंभमेळा सेवेचा व ए. ए. डी.एम्. चा Batch लावूनच सेवा करावी.
२२) डि. एम. व्ही. नी को - ऑडीनेटरच्या संपर्कातरहावे.
२३) प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईल फोनचा मर्यादितवापर करावा.
२४) ए. ए. डी. एम्. कंट्रोल रूम मधील डि. एम.व्ही. चे फोन नंबर जवळ असावेत.
२५) डि. एम. व्ही. नी "First Aid Kit" स्वतःच्यापाउच मध्ये बाळगावे.
२६) सेवा करतांना प्रत्येक डि. एम. व्ही. नी ही सेवाआनंदाने व भक्तीने करावयाची आहे, आपणसर्वजण परमपूज्य बापूंच्या खिडक्या आहोत हेलक्षात ठेवावे.
!! हरी ओम !! श्री राम !! अम्बज्ञ !!
--
ashutosh tembe CFP
9869089027/8691013831
www.orchidfp.com
No comments:
Post a Comment