Tuesday, 25 November 2014

श्रीवर्धमान व्रताधिराज

"     श्रीवर्धमान व्रताधिराज  "

'श्रीवर्धमान व्रताधिराज ' म्हणजे यच्चयावत् ,यावच्चंद्रदिवाकरो सर्व व्रतांचा मुकुटमणि .
श्रीवर्धमान व्रताधिराजाचे पालन दरवर्षी करणा-या  व्यक्तिस  इतर कुठ्ल्याही  व्रताची मुळी गरजच उरत नाही आणि त्याचबरोबर हेही सत्य आहे की श्रीवर्धमान करणा-या  व्यक्तिस इतर कुठल्याही प्रकारची व्रते केल्यास त्याचे दश्गुणा पुण्य व लाभ प्राप्त होतात.
   श्रीवर्धमान व्रताधिराज  म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही .
   श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्वसामान्यांपासुन संतांपर्यंत , अशिक्षितांपासुन उच्चशिक्षितांपर्यंत, महापाप्यांपासुन पुण्यवंतांपर्यंत, प्रत्येकाला समानपणे भगवतकृपेचा आधार व दुःखमय प्रारब्धाचा नाश प्राप्त करुन देणारे सर्वोच्च व्रत होय.
   कलियुगातील ह्यापुढील संपुर्ण कालावधीसाठी  श्रीवर्धमान व्रताधिराज एकदाही न करणा-या व्यक्तिस जीवनसार्थक्य कधीही प्राप्त होऊ शकणार नाही .
     सर्व प्रकारच्या व्रतांचे सर्व प्रकारचे लाभ फक्त ह्या सर्वोच्च व्रताने प्राप्त होतात.
   श्रीवर्धमान व्रताधिराजचे ज्याने आपल्या आयुष्यात वयाच्या अठराव्या वर्षापासुन ( अठरा वर्ष पूर्ण ) देहपतनापर्यंत दरवर्षी पालन केले आहे अशी व्यक्ति भगवंताच्या भर्गलोकात थेट प्रवेश मिळविते. ह्यासच  ' सामीप्य ' असे म्हणतात .
भर्गलोकात एकदा प्रवेश मिळालेल्या जीवात्म्याचे परत कधीही पतन होत नाही व त्याचे पुढील जन्मही सुखद , पवित्र  व मंगलमय असतात व त्याच्या पुर्नजन्माचे कारण  त्याचे प्रारब्ध न राहता भगवंताच्या इच्छेने भगवंताचे कार्य करणे हेच असते .
   ह्या भर्गलोकासच  " गोकुळ " , ' गोलोक ' किंवा  ' परमात्म्याचा प्रेमलोक ' असे म्हणतात .  श्रीवर्धमान व्रताधिराजाचे आपल्या आयुष्यात कमीतकमी २४ वेळा किंवा अठराव्या वर्षापासुन मृत्युपर्यंतच्या वर्षाच्या संख्येच्या निम्म्या संख्येइतकेवेळा पालन करणारी व्यक्ति जन्मभर अधिकाधिक पुण्यवान व सुखी बनतेच परंतु त्यास शांती व  तृप्ती सदैव प्राप्त होतात . अशी व्यक्ति देहपतनानंतर ओजलोकात निवास करते  व पुढील जन्मात अधिकाधिक सुंदर परमार्थ करण्यासाठी पात्र होते.
   संपुर्ण आयुष्यात कमीतकमी ९ वेळा किंवा आयुष्यवर्षसंख्येच्या एक चतुर्थांश संख्येइतके व्रतपालन करणा-या व्यक्तिच्या पंचमहापापांचे निरसन होते व त्यास देहपतनानंतर यज्ञलोकाची प्राप्ती  होते . यज्ञलोकात त्यांना पुढील प्रगतीसाठी ज्ञानसामर्थ्य देऊन मगच भूलोकी परत जन्म दिला जातो व त्यामुळे अशा व्यक्ति पुढील जन्मात श्रीमंत , संपन्न व सुसंस्कृत पुरुषार्थी घरात जन्माला येतात .
   ज्या व्यक्तिने संपुर्ण  आयुष्यात कमीतकमी  एकदा तरी मनःपूर्वक व्रताधिराजाचे पालन केले आहे, त्याच्या मार्गातील दुःखद घटनांचे दुःखदत्व कमी होते आणि देहपतनानंतर त्यास तपोलोकात प्रवेश मिळतो .
  ज्या व्यक्तिने संपुर्ण आयुष्यात एकदाही व्रताधिराजाचे पालन केले नाही तर त्यास अंतरिक्षलोकात प्रवेश  मिळतो व तेथुन लगेचच परत भूलोकी आपले प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म दिला जातो .
  एकापेक्षा जेवढ्या म्हणुन अधिकवेळा ह्या सांवत्सरिक व्रताधिराजाचे पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात मनुष्य ह्या भूलोकात अधिकाधिक सुखप्राप्ती व दुःखनिवृत्ती मिळवितो  व परलोकातही अधिकाधिक वरची  श्रेणी प्राप्त करतो.

                    मी अंबज्ञ आहे

Tuesday, 18 November 2014

आदर्श विद्यार्थी

आदर्श विद्यार्थी
in Marathi, The Bapu That I Know
- बकुळ मर्चंट

  पराडकरबाई – बापूंच्या सर्वात लाडक्या शिक्षिका. शिरोडकर शाळेत नवीन शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. बापू आणि पराडकरबाई यांच्यात फक्त आठ नऊ वर्षांचच अंतर. एम.एस.सी. झालेल्या पराडकर बाई सायन्स उत्कृष्ट शिकवायच्या. पण पहिल्याच वर्षी त्यांना ७वीच्या वर्गावर म्हणजेच बापूंच्या वर्गावर भूगोलाचा विषय शिकवायला दिला गेला.

  भूगोल म्हणजे बाईंचा अगदी नावडता विषय. पण नाईलाजाने शिकवणं भाग पडलं. बापू म्हणजे अगदी खोडकर. बाई वर्गात आल्या की प्रत्येक तासाला विचारायचे, ‘‘बाई, कुठला नकाशा आणू? जगाचा की भारताचा की पृथ्वीचा गोल आणू?’’ त्या गोलाचं नाव ऐकताच बाईंच्या पोटात गोळा यायचा. बापू प्रश्‍नही असे विचारायचे की बाई बुचकळ्यात पडायच्या. काहीतरी करून वेळ मारून न्यायच्या. पण मग टीचर्सरुममध्ये भूगोलच्या एक्सपर्ट काळेबाईंकडून त्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायच्या. भूगोलाबद्दल अगदी बारकाईने विचारायच्या. काळेबाई म्हणायच्या सुद्धा, ‘‘अगं, कितवीला शिकवायचंय?’’ पराडकरबाई म्हणायच्या, ‘‘सातवीला’’. काळेबाई म्हणायच्या, ‘‘अरे, मला वाटलं अकरावीला की काय. एवढं डीटेल काय करायचंय?’’

  पण पराडकर बाईंची स्थिती त्यांची त्यांनाच माहीत. पराडकर बाई भूगोलाचं खूप टेन्शन घ्यायच्या. सोमवारी आणि गुरुवारी भूगोलचा पिरिअड असायचा. त्यामुळे रविवारी आणि बुधवारी ‘‘उद्या बापू काय विचारणार’’ या टेन्शनने झोप नाही तर मंगळवारी व शुक्रवारी पुढच्या पिरियडला बापूंना काय उत्तर द्यायचं या टेन्शनने झोप नाही. काळेबाईंकडून उत्तर तयार करून पुढच्या तासाला जायच्या. उत्तर देणार इतक्यात बापू म्हणायचे, ‘‘त्या प्रश्‍नाचं उत्तर मला कळलं. आता दुसरी डिफकल्टी सॉल्व्ह करा.’’ बाई पुन्हा हादरायच्या. कसंबसं एक वर्ष पार पडलं. पुढच्या वर्षी मात्र बाईंनी सुपरवाईझर ए.के. गावकर सरांना सांगून टाकलं, ‘‘मला हवं तर एकही ऑफ पिरियड देऊ नका, पण भूगोल शिकवण्याची शिक्षा मात्र नको. ही वात्रट मुलं माझी भंबेरी उडवतात.’’

आता मन:सामर्थ्य देऊन टेन्शन कमी करणारे बापू लहानपणी मात्र बाईंना असं टेन्शन द्यायचे.

  पराडकर बाईंच्या सेंडऑफच्या दिवशी बापू स्वत:च म्हणाले, ‘‘मला न आवडणारा भूगोल पराडकर बाईंनी छान शिकवला आणि मलाही तो छान कळला.’’

 
  बापू सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अगदी पुढे असायचे. वक्तृत्त्व स्पर्धा असो, नाट्यप्रवेश असो, की नाटक असो, आंतरशालेय स्पर्धांमध्ये (कुमार कला केंद्र वगैरे) बापूंनी भाग घेतला म्हणजे बक्षिसं घेऊन येणारच.

  एस.एस.सी. ला असताना सुद्धा पिरियड चुकवून नाटकाच्या तालमी चालायच्या. मग पराडकर बाईंनाच काळजी वाटायची. त्या कळकळीने बापूंना सांगायच्या, ‘‘अरे, आता नाटकं कमी कर. तुझा पहिला नंबर जाईल.’’ बापू म्हणायचे, ‘‘बाई, काळजी करू नका. मी अभ्यास करेन.’’ पण बाईंना काही चैन पडायचं नाही. त्या शाळेतल्या प्यूनला सांगून ठेवायच्या, ‘‘तालीम संपल्यावर बापूंना घरी जायला देऊ नकोस. टीचर्सरूममध्ये पाठव.’’ त्या बापूंना जबरदस्तीने अभ्यासाला बसवायच्या, चुकलेला अभ्यास शिकवायच्या, त्यांची तयारी करून घ्यायच्या. बाईंचे हे ॠणही बापूंनी स्वत: सर्वांना सांगितलं होतं.

  काही वर्षांपूर्वी धनलक्ष्मी पूजनाला पराडकर बाई वांद्रयाला आल्या होत्या. त्यांच्या बाजूला बापूंची आई होती. आई म्हणाली, ‘‘बाई, तुम्ही बापूंना लहानपणी पोवाडा खूप छान शिकवला होता हं’’ पराडकर बाई बुुचकळ्यात. ‘‘मी कधी शिकवला पोवाडा?’’ नंतर आई म्हणाली, ‘‘बापूला मी कधी विचारलं की हे कुठे शिकलास की बापू म्हणायचा, हे मला पराडकर बाईंनी शिकवलं.’’ एम.बी.बी.एस. झाल्यावर बापू बाईंना पेढे घेऊन घरी गेले होते. धुळ्यात इंटर्नशिपसाठी पराडकर बाई भेटल्या असताना बापू म्हणाले, ‘‘बाई तुम्ही अजून मजासवाडीतच रहाता ना?’’ बाईंनी विचारलं, ‘‘अरे, तुझ्या अजून लक्षात आहे?’’ तेव्हा बापू म्हणाले, ‘‘बाई, मी चार पाच वेळा तुमच्या घरी येऊन गेलो आहे. तुमची मजासवाडी माझ्या चांगलीच लक्षात आहे.’’

  असा हा शिक्षकांची भंबेरी उडवणारा, तरीही त्यांना खूप आदर देणारा, त्यांचे ॠण स्मरणारा बापू. बापू मस्ती खूप करायचे. पण त्या मस्तीला सुद्धा एक स्टॅन्डर्ड होता. त्यामुळे त्यांची मस्ती कुणाला खुपायची नाही, उलट सुखवायची.

  पराडकरबाईंना बापूंच्या अस्तित्वाची जाणीव बर्‍याच प्रसंगी झाली आहे. आईच्या मांडीचं हाड मोडल्याने मेजर ऑपरेशन करणं भाग होतं. ७८ वर्षाच्या बाईचं साडेपाच तास चाललेलं ऑपरेशन; लोकल ऍनस्थेशिया दिला होता. पूर्ण ऑपरेशनमध्ये अतिशय को-ऑपरेशन मिळाल्याबद्दल डॉक्टरांनी आईकडे त्यांची प्रशंसा केली. आई म्हणाली, ‘‘संपूर्ण ऑपरेशनभर माझा हात हातात घेऊन शर्टपॅन्टमधला एकजण मला धीर देत होता, काही काळजी करू नका असा आश्‍वासक आधार देत होता. मग मी कशाला घाबरू?’’ ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी छातीला लावलेल्या बापूंच्या फोटोनेच त्यांचं ऑपरेशन सुखदपणे पार पाडलं होतं.

  बाईंना अजून ही एक प्रचिती आली. बाईंच्या सेंडऑफला परबबाईंनी बापूंचा मोठा फोटो त्यांना दिला होता. माझा बापूच मला भेटायला आला म्हणून पराडकरबाई खूष झाल्या. मला स्वत: फोन करून बाईंनी कळवलं. बाईंना बापूंकडे येणं शक्य होत नसल्याने स्वत:च त्यांच्याकडे जाणारा हा बापू.

आजही शाळेची वीट न वीट आठवणीने जपणारा बापू म्हणूनच मनाला खूप भावतो.

  बापू अतिशय हुशार मुलगा. वर्गात दोन मॉनिटर असायचे. एका मॉनिटरने मस्ती करणार्‍यांची नावे लिहीली की बापू, म्हणजे दुसर्‍या मॉनिटरकडून ती खोडली जायची. कारण सर्वात मस्तीखोर हाच.

  बापू मॉनिटर होते तेव्हाची ही आठवण. एका मुलीला काही मस्ती केल्यावरून वर्गाबाहेर ओणवं उभं रहाण्याची शिक्षा दिली गेली होती. बापू हळूच तिच्या कानात जाऊन बोलले, ‘‘चक्कर येण्याचं नाटक कर.’’ तिने खरच चक्कर आल्याचं सोंग केलं आणि तिची शिक्षा वाचली. असा हा आपल्या मित्र मैत्रिणींचा कैवार घेणारा बापू.

  परळसारख्या कामगार वस्तीतल्या आमच्या शिरोडकर शाळेत सारीच मुलं सांपत्तिक दृष्ट्या कनिष्ठ वर्गातली. बापू संपन्न घराण्यातील, जातीने उच्चवर्णाचे, दिसायला रुबाबदार, अभ्यासाबरोबरच सर्व क्षेत्रांमध्ये चमकणारे. हातात स्टीलची पेटी घेऊन गाडीतून शाळेत येणारा हा एकमेव विद्यार्थी. त्यामुळे आम्हाला सुरुवातीला थोडं दडपण यायचं.

  पण बापू अतिशय निगर्वी, मनमिळावू. त्यांना त्यांच्या सुसंपन्न, खानदानी घराण्याचा गर्वही नव्हता की स्वत:च्या रुबाबाची, हुशारीची ऐटही नव्हती. त्यामुळे सर्वांनाच तो आपलसं करायचा, सार्‍यांना त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा, सर्वांचा तो लाडका असायचा. शाळेतले प्यून, कँटीनवाला, स्टेज मॅनेजर, लायब्ररीयन, लॅब असिस्टंट, सारे शिक्षक-शिक्षिका, प्रिन्सिपल, सारे विद्यार्थी-विद्यार्थिनी सार्‍यांनाच तो आपला वाटायचा.

  अगदी त्या गोकुळातल्या कृष्णासारखाच, सर्वांच्या खोड्या काढूनही त्यांची बाजू घेऊन भांडणारा आणि आपली बाजू नेमक्या शब्दांत सांगून सर्वांच्या गळी उतरवणारा हा बापू!

  बापू आमच्याशी एका नॉर्मल मुलाप्रमाणेच नेहमी वागले. त्यामुळे त्याच्याशी खेळताना, मस्ती करताना, रुसताना, त्याच्याशी स्पर्धा करताना आपण हे सारं कुणाबरोबर करतो आहे याचं ज्ञान नव्हतं. आज बापूंचं खरं स्वरूप कळल्यानंतर मन:स्थिती थोडी विचित्र होते. का नाही त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण काळजावर कोरून ठेवला? मनात येतं, त्या बाळबापूच्या सहवासाचं भाग्य पुन्हा मिळेल का?
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Thursday, 13 November 2014

हेमाडपंतांविषयी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

हेमाडपंतांविषयी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
(१) हेमाडपंत ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते.
(२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१)
(३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न.
इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत शिरडीस जाण्याचे निश्‍चित ठरवतात. शिरडीला जायचं ठरतं, पण अचानक एक गोष्ट घडते, मनामध्ये विकल्प येतो. हेमाडपंतांच्या मित्राचा मुलगा अचानक निवर्ततो. हेमाडपंत मुद्दाम मुलाविषयी थोडक्यात लिहितात.
(१) त्यांच्या मित्राचा मुलगा एकुलता एक आहे.
(२) शरीराने सुदृढ आहे.
(३) गुणवंत आहे.
(४) तो शुद्ध हवेच्या ठिकाणी (लोणावळ्यात) असताना ज्वराक्रांत झाला.
(५) सगळे मानवी उपाय केले जातात.
म्हणजेच मुलात किंवा भोवतालच्या परिस्थितीतही दोष काढण्यासारखे काहीही नसतानाही मुलाचा मृत्यू होतो आणि म्हणूनच हेमाडपंत शब्द वापरतात – ‘प्रारब्धकर्मप्राबल्यता’. (संदर्भ अ. २/ओ. १०९)
म्हणजेच अनेक उपाय केले जातात, देव-देवतांना नवस केले जातात. त्या मित्राच्या गुरुंनाही मुलाच्या जवळ आणून बसवलं जातं. तरीही मुलाचा मृत्यू होतो आणि मग उद्विग्न मनःस्थितीतील हेमाडपंतांसमोर प्रश्न उभा राहतो की गुरुची हीच उपयुक्तता का? कर्मामध्ये, नशीबामध्ये माझ्या जे आहे, ते होणारच असेल तर गुरुची आवश्यकता काय? एक मोठा विकल्प येतो.
हेमाडपंत पुढे म्हणतात की यामुळे शिरडीला जाण्याच्या माझ्या निश्‍चयात मोडता पडला. या मनःस्थितीत गुरुविषयी लिहिताना हेमाडपंत म्हणतात -
(१) हाच ना लाभ गुरुचे संगती! (मित्राच्या मुलाचा मृत्यू)
(२) गुरु काय करिती कर्मासी – (प्रारब्धकर्मप्राबल्यता)
(३) नशिबात असेल तेच घडणार असेल तर गुरुवीण काय अडणार आहे?
(४) गुरुच्या पाठीमागे जाऊन उगीचच आपला सुखातील जीव दुःखात का पाडा?
(५) यदृच्छेने जे जे घडणार असेल, ते ते सुख वा दुःख भोगू – गुरुच्या कडे जाऊन काय होणार आहे?
अशाही स्थितीत हेमाडपंत स्पष्ट करतात -
जयाचे जैसे अर्जित| नको म्हणता चालून येत|
होणारापुढे काहीही न चालत| नेले मज खेचीत शिरडीसी॥
(संदर्भ अ. २/ओ. ११४)
‘सांगू एकदा सांगू दोनदा’ या नियमाने साईनाथांच्या इच्छेने हेमाडपंतांना काकासाहेब दीक्षितांच्या कडून निरोप येतो. मार्ग दाखवला जातो; पण स्वतःच्या कृतीने – विकल्पाने हेमाडपंत शिरडीस जाण्याचे टाळतात. पण कृपाळू ‘दयाघन’ साईनाथ पुन्हा एकदा वेगळा प्रसंग घडवून आणतात; आता साईनाथांच्या लीलेने नानासाहेब चांदोरकरांकडून हेमाडपंतांना मार्ग दाखवला जातो, पण कसा? तर चांदोरकर दादर स्टेशनवर बसले असताना त्यांना त्या ‘बुद्धिस्फुरणदात्या’ साईनाथांकडून अशी प्रेरणा होते की की वसईला जायला अवकाश आहे; मध्ये एक तासाचा अवधी आहे. तर हा एक तास एका कामास लावूया. 
(लावू की कामास एकादिया – संदर्भ अ.२/ओ.११६)
अशी साईनाथांची स्फूर्ती होताच दादर स्टेशनवर एक गाडी येते; केवळ वांद्र्याकरिता आणि मग नानासाहेब त्या गाडीत बसून वांद्र्यास येतात व मग नानासाहेब हेमाडपंतांकरता निरोप पाठवतात. म्हणजेच काय
(१) नानासाहेबांच्या मनात ‘काम’ कुठलं करायचं आहे हे स्पष्ट आहे.
(२) नानासाहेबांकडे हेमाडपंतांना निरोप पाठवण्याची व्यवस्था आहे.
(३) साईनाथांच्या लीलेने, जिथे निरोप पाठवला जातो, तेथे हेमाडपंत आहेत.
(४) त्यावेळेस हेमाडपंता नानासाहेबांना त्वरित भेटायला येण्याच्या स्थितीत आहेत – जर उशीर झाला असता तर नानासाहेब भेटू शकले नसते.
म्हणजेच सद्गुरुमाऊली कशाप्रकारे घटना घडवून आणू शकते, ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
इथे हेमाडपंत अजून साईनाथांचे भक्त झालेले नाहीत; साईनाथांना भेटलेलेही नाहीत, फक्त काकासाहेब दीक्षितांकडून साईनाथांची महती कळली आहे व नानासाहेब चांदोरकरांनी कशासाठी बोलावून घेतलं आहे याचीही कल्पना नाही; म्हणजेच सद्गुरु भक्तांचे पूर्वजन्म जाणून अशी रचना करतात, प्रसंग घडवून आणतात, अशी परिस्थिती निर्माण करतात की त्याला सद्गुरुकडे जाण्याची ‘सुसंधी’ प्राप्त होते; पण निर्णय त्या त्या भक्तालाच करावा लागतो. प्रथम संधी होती, तेव्हा हेमाडपंतांकडून ती नाकारली गेली.
म्हणून साईनाथांनी दुसरी संधी देताना ‘प्रांताधिकारी’ असलेल्या नानासाहेबांकडून हेमाडपंतांस शिरडीच्या कथा ऐकवल्या. हेमाडपंतांनीही मोकळ्या मनाने, प्रांजळपणे नानासाहेबांची आतूरता बघून अत्यंत शरमेने मनाची झालेली चंचलता नानासाहेबांना निवेदन केली. साईनाथांच्या स्फूर्तीने नानासाहेबांनी अत्यंत तळमळीने, प्रेमाने हेमाडपंतांच्या सर्व शंकांचे निरसन करून, हेमाडपंतांकडून ‘तत्काळ निघतो’ असे वचन घेतले. एवढेच नाही, तर असे वचन घेऊनच नानासाहेबांनी तेथून प्रयाण केले. (संदर्भ अ.२/ओ.१२२) हीच ती साईनाथांची लीला

Tuesday, 11 November 2014

Samirdada Blog

http://aniruddhafriend-samirsinh.com/ambadnya-pratyaksha-anunnaki-series/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=ambadnya-pratyaksha-anunnaki-series

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...