Saturday, 30 July 2016

दीप अम्वास्या ०२/०८०२०१६

*2nd August 2016*...
*Nandai's....HAPPY WAALLAA BIRTHDAY* ....
Coped from - सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)

दीप  अमवास्या, तुमच्या आईचा वाढदिवस. अतिशय पवित्र तिथी आहे. अनेकांनी प्रश्न विचारले होते, "बापू आम्ही काय करु शकतो, ह्या दिवशी?”

तर ह्या दिवशी रात्री १० नंतर घरामध्ये पणती पासून समईपर्यंत कुठलाही एक दिवा प्रज्वलित करा, घरात आरास करा, रांगोळी काढा. जशी इच्छा असेल तसे सजवा. शांतपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत रहा. त्या ज्योतीकडे बघत आई, आई, आई (३ वेळा) म्हणा.
एरव्ही आपण फुलाने दिवा शांत करतो. पण हा दिवा शांत करायचा नाही. ही ज्योत म्हणजे तुमच्या आईचे आगमन असेल, ह्याची खात्री मी देतो त्या दिव्याकडे बघता बघता म्हणायचे, Happy Birthday To You..... कुठल्याही भाषेत म्हणा जेव्हा आई, आई.... म्हणाल, तेव्हा आई आलेलीच असेल नक्की.
 
 
!! हरि ॐ!!

Tuesday, 19 July 2016

प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी

ll हरी ॐ ll
प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी :
( अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगष्ट २००९):
(१) आन्हिक दररोज दोन वेळा करणे.
(२) आन्हिक, रामरक्षा, सद्गुरु गायत्री मंत्र (अनिरुद्ध गायत्री मंत्र), सद्गुरु चालीसा (अनिरुद्ध चालीसा), हनुमान चालीसा व दत्तबावनि तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यातून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.
(३) बरोबरच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे, सहकाऱ्यांची किंवा हाताखालील व्यक्तिंची चुक झाल्यास त्यांना जरुर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
(४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणाऱ्या प्रत्त्येकाने ' आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.
(५) बोलण्यापेक्षा , बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.
(६) ह्या विश्वामधे कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दूसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही' असे म्हणु शकत नाही व असे कुणीही मानु नये.
(७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
(८) चुक झाल्यास चुक सुधारण्याची तयारी पाहिजे.
(९) परपीड़ा कधीच करता कामा नये.
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मुलभुत सिद्धांता नुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकड़े नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरुनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत.

ll अनिरुद्ध. ll

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...