हरी ओम मित्रांनो,
आज दिनांक २८ मे ह्याच दिवशी बरोबर "१९" वर्षांपूर्वी आपल्या सद्गुरू बापूंनी आपले सद्गुरू तत्त्वाचे प्रकटीकरण साईनिवास येथे केले
"पहिले दिवशी साईरूप स्पष्ट दाखविले डोळे भरले मन सरले हृदय थबकले"
हाच ते दिवस ज्या दिवशी सौ. मिनावैनी व श्री. आप्पासाहेब दाभोलकर (सद्यपिपा) ह्या उभयतांना परम पूज्य बापूंनी साक्षात साई रुपात दर्शन दिले.
ते ही स्वतःच साईनाथ असल्याची पक्की खूण पटवत.
बाबांनी देह ठेवण्यापूर्वी श्री साईसच्चरीत्रकार हेमाडपंत म्हणजेच श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर यांच्याकडे काही पवित्र वस्तू जतन करण्यासाठी दिल्या त्या म्हणजे दोन नाणी, एक शाळीग्राम, एक रुद्राक्षाची माळ आणि एक छोटा त्रिशुळ व सांगितले जो कोणी स्वतःहून ह्या वस्तू तुमच्याकडून मागून घेईल ते दुसरा कोणी नसून मीच असेल ह्याची खात्री बाळगा.
हेमाडपंत ह्यांनी स्वतःच्या अखेरच्या श्वासापर्यंत अतिशय ही गोष्ट गोपनीय ठेवली तोवर कोणी ह्या वस्तू मागितल्या नाहीत व शेवटच्याक्षणी त्यांचे चिरंजीव श्री गजानन गोविंद दाभोलकर यांच्यापाशी ही गोष्ट सांगितली व त्यांनाही ही गोष्ट गोपनीय ठेवण्यास सांगितले व त्यांनी देह ठेवला.
नंतर बराच काळ लोटला कोणीही या वस्तू मागितल्या नाहीत मग श्री गजानन गोविंद दाभोलकर यांचीही शेवटची वेळ जवळ येते आहे कळल्यावर त्यांनी आपले सुपुत्र श्री. आप्पासाहेब दाभोलकर (सद्यपिपा) व सौ. मिनावैनी यांना जवळ घेऊन ही गोष्ट सांगितली.
त्यांनीही ही आज्ञा पाळली, कुठेही वाच्यता न करता ह्या गोष्टी जपून ठेवल्या.
मध्यंतरी साईनिवास येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे एक डॉ व सामान्य साईभक्त म्हणून साईनिवास येथे भेट देऊ लागले
२८ मे १९९६ रोजी सहज बोलता बोलता त्यांनी या गोष्टींची मागणी या दाम्पत्याकडे केली व म्हटले त्या गोष्टी माझ्या आहेत त्या मला द्या म्हटल्यावर त्यांना क्षणभर काही न कळल्यासारखे झाले. नंतर त्यांना या गोष्टीचा संदर्भ बाबांच्या वस्तूंशी झाल्यावर त्यांनी त्या गोष्टी परम पूज्य बापूंकडे सुपूर्द केल्या.
तत्पूर्वी सौ. मिनावैनींनी पडताळणी करण्यासाठी आपल्या देवघरातील रुद्राक्षाची माळ त्या वस्तूंमध्ये ठेवली व बाबांची माळ तशीच देवघरात ठेवली. पण बापूंनी मात्र त्यांच्याकडून माझी माळ मला दे म्हणून ती मूळ माळ मागून घेतली.व साक्षात साईनाथांच्या रुपात परम पूज्य बापूंनी त्यांना दर्शन दिले.
वरती पाहतायत तर कफनी घातलेले श्री साईनाथ व पाय मात्र डॉ. जोशींचे.
साईनिवास में परगट ग्वाला हेमड्या की अंतिम ज्वाला
पूजन मीना भाभी किन्हा सद्गुरू रुपमे दरसन दिन्हा
दोघांनीही साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घातला या सुखद धक्क्यातून सावरत असताना बापू म्हणाले "मी सांगेपर्यंत या गोष्टीची वाच्यता करू नका."
असा हा आजचा सोन्याचा दिवस ह्या पवित्र दिवशी बापूंनी त्यांच्या अकारण कारुण्याने सर्व श्रद्धावानांसाठी अवतार कार्यास आरंभ केला.
माझ्या सर्व श्रद्धावान मित्रांना अनिरुद्ध प्रकट दिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा.
श्रीराम...... अंबज्ञ
No comments:
Post a Comment