श्रीअनिरुद्ध चलिसा पठण - १२ ऑक्टोबर २०१४
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही श्रीअनिरुद्ध चलिसा पठणाचा सोहळा रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०१४ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे आयोजित करण्यात आला आहे. सलग तीन वर्ष श्रीहरिगुरुग्राम येथे हे सांघिक पठण अयोजीत करण्यात येत आहे. आपण सर्व श्रध्दावान खरोखरच अंबज्ञ आहोत की ह्या श्रीअनिरुध्द चलिसेच्या पठणात सहभागी होण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळतेय. बापूंच्या सार्या श्रद्धावान मित्रांना ह्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण. श्रीअनिरुद्ध चलिसाच्या पठणाने सद्गुरूंवर आपला विश्वास अधिक बळावतो व “एक विश्वास असावा पुर्ता, करता हरता गुरू ऎसा" हा भाव दृढ होतो.
पठणाची सुरुवात परमपूज्य सद्गुरू बापूंच्या पदचिन्ह व मूर्तीच्या आगमनाने साधारण ९ वाजता करण्यात येईल. ह्यानंतर क्रमाने आन्हिक, श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनम् आणि सदगुरु बापूंची नऊ वचन होतील. ह्यानंतर श्रीअनिरुद्ध चलिसेच्या अखंड पठणास सुरुवात होईल. सोहळ्याची सांगता सद्गुरूंची आरती व श्रीअनिरुध्द पाठ याने करण्यात येईल. प्रत्येक श्रद्धावानाला परमपूज्य अनिरुद्ध बापू, नंदाई आणि सुचितदादांच्या पदचिन्हांना बिल्वपत्र व तुलसीपत्र अर्पण करण्याची संधी मिळेल.
ज्या श्रध्दावानांना ह्या सोहळ्यामध्ये जपक म्हणून भाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी आपली नावं प्रभाकरसिंह शेट्टी (मोबाईल नंबर 98209 98544) व शेषगिरीसिंह शेट्टी (मोबाईल नंबर 98200 90397) यांना दिलेल्या नंबरांवर फोन करुन द्यावीत.
मला पुर्ण खात्री आहे की सर्व श्रद्धावान ह्या ’आनंददायी’ सोहळ्यात सहभागी होतील.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll
No comments:
Post a Comment