Sunday, 7 September 2014

मातृविश्वास प्रार्थना

मातृविश्वास प्रार्थना

"हे माझ्या लाडक्या आदिमाते ! तुझ्याकडे सर्वकाही विपुल आहे .

हे महिषासुरमर्दिनी ! तुझे सामर्थ्यही अफाट आणि तुझी दयाही अपार .

हे महालक्ष्मी ! तुझी शस्त्रेही प्रचंड बलवान व तुझी संरक्षक शक्तीही .

हे ब्रम्ह त्रिपुरसुन्दरी ! तुझे ऐश्वर्याचे भांडारही विशाल आणि तुझी दानशूरताही विशाल .

हे महिषासुरमर्दिनी ! मला जेवढ्या अन्नाची गरज असते , त्याच्यापेक्षा जास्त तू माझ्यासाठीच राखून ठेवले आहेस .

हे आदिमाते ! मला विश्रांतीसाठी जेवढ्या जागेची आवश्यकता आहे , त्याच्यापेक्षा ही मोठी जागा तू माझ्यासाठी राखून ठेवली आहेस .

हे आदिमाते ! मला श्वास घेण्यासाठी जेवढ्या हवेची गरज आहे , त्याच्या पेक्षा खूपच जास्त हवा तू माझ्या आजूबाजूला राखून ठेवली आहेस.

हे अनसूये ! मला जेवढ्या मदतीची गरज आहे , त्याच्यापेक्षाही खूपच जास्त मदत तू माझ्या चहूबाजूला आणून उभी केली आहेस.

हे गायत्री ! मला जेवढ्या ज्ञानाची आवश्यकता आहे , त्याच्यापेक्षा खूपच जास्त ज्ञान तू मला अनुभवातून देत राहतेस .

हे चंडिके ! मला जेवढी संधी मिळायला हवी आहे , त्यापेक्षा अधिक ताकदीची नवनवीन संधी तू मला देत राहतेस.

हे अठरा हातांच्या आदिमाते ! मला जेवढ्या संरक्षणाची व सुरक्षिततेची जरुरी आहे , त्याच्यापेक्षा खूपच जास्त सूरक्षितता मला केवळ चंडिकाकुलाच्या दर्शनानेच प्राप्त होते.

हे आदिमाते ! तुझे चंडिकाकुल हेच माझे खरेखुरे व मूळ कुटुंब आहे."

No comments:

Post a Comment

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...