!! हरि ॐ !!
26-6-15
’अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् अॅन्ड बोन्साय स्पोर्टस्’
प्रशिक्षक तयार करणे बाबत
आपणा सर्वांस माहितच आहे की, परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी ६ मे २०१० च्या आपल्या रामराज्याच्या प्रवचनात ’अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् अॅन्ड बोन्साय स्पोर्टस्’ ची माहिती करून देताना व खेळाचे महत्व सांगताना परमपूज्य बापू म्हणाले " जो जास्त खेळतो, त्याचा मेंदू जास्त तल्लख होतो. नुसता खेळ व अभ्यास योग्य प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला जो पॉझिटिव्हनेस् येतो, जी खिलाडीवृत्ती, कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळीच काम करण्याची धमक येते. स्त्री-पुरुषांनी सुद्धा खेळावे. चाळीशीलाही खेळावे, पन्नाशीलाही खेळावे, साठीलाही खेळावं आणि म्हणुनच जास्तितजास्त श्रद्धावानांना खेळाचे लाभ घेता यावे ह्या हेतुने आज पर्यंत सदर इन्स्टिट्यूटने ८० प्रशिक्षक तयार केले आहे जे मुंबईतील विवीध केंद्रांवर जाऊन श्रद्धावानांकडून खेळ खेळून घेतात.
जास्तितजास्त उपासना केंद्रांना व श्रद्धावानांना ह्या कार्यात सहभागी होता यावे ह्याकरिता प्रशिक्षकाची दुसरी बॅच रविवार दिनांक १९ जुलै २०१५ पासून श्री हरिगुरुग्राम बांद्रे येथे सकाळी ७:३० ते ९:३० या वेळात सुरु होत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साधारण ३ महिन्याचा असेल.
ज्या श्रद्धावानांना ह्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून सेवा करायची इच्छा आहे व जे महिन्यातून कमीत कमी ३ रविवार प्रत्येकी २ तासांचा वेळ देऊ शकतात, अशा इच्छुक श्रद्धावानांनी फोटोसहित सोबत जोडलेला अर्ज गुरुवारी श्री हरिगुरुग्राम, बांद्रे येथे मैदानात बॅज काऊंटरच्या बाजुला असलेल्या इन्स्टिट्यूटच्या काऊंटरवर अथवा दर शनिवारी उपासना केंद्रावर अथवा email द्वारे aniruddhasbonsaisports@gmail.com ह्या email id वर उशिरात उशिरा रविवार दिनांक १२ जुलै पर्यंत पाठवावा. अर्ज पाठविताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
१. वय १६ वर्षांपेक्षा अधिक असावे.
२. मेडिकली फीट असावे.
३. ए.ए.डी.एम्. बेसिक कोर्स केलेली / केलेला असावा.
हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ